मे. एम्पायर एंटरप्राईजेस, मे. शंकर एंटरप्राईजेस व मे. एम. एम. एंटरप्राईजेस या व्यापाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरीविरोधी विशेष कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहीमेअंतर्गत शंकर आप्पा जाधव, बापू वसंत वाघमारे व आदेश मधुकर गायकवाड यांना दि. 28 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या धडक कारवाईमुळे राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-अ, मुंबई, राहुल द्विवेदी (भा.प्र.से.) व राज्यकर उपआयुक्त संजय वि. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त राहुल मोहोकर व गिरीश पाटील यांनी राबवली.
सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत आठ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत, व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांस एक प्रकारे इशारा दिलेला आहे.