चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा, अवघ्या 60 दिवसात विशेष न्यायालयाने दोषी ठरवत सुनावली शिक्षा

गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:53 IST)
चाळीसगाव तालुक्यातील चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या नराधमास जळगाव विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे या 27 वर्षीय नराधमास अवघ्या 60 दिवसात विशेष न्यायालयाने दोषी ठरवत सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा दिली. चाळीसगाव शहरातील चार वर्षाच्या चिमुकलीला बिस्कीटचा पुडाचे आमिष देऊन नराधमाने रेल्वे स्थानकाजवळ नेवून अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना 27 नोव्हेंबर रोजी घडली होती. 
 
याप्रकरणी जळगाव विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे जिल्हा सरकारी वकील एडवोकेट केतन ढाके यांच्या विनंतीनुसार सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला व अवघ्या 60 दिवसात या प्रकरणी सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने नराधमास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे व सोबतच दोन लाख 75 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दंडातील 50 टक्के रक्कम व मनोधैर्य योजनेतून 3 लाख रुपये व शासनाकडून 10 लाख रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती