केदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड कोसळून श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

रविवार, 3 जुलै 2022 (15:02 IST)
केदारनाथ -बद्रीनाथ देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर काळाने झडप घातली. या वाहनांवर दरड कोसळून श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर या अपघातात नऊ जण जखमी झाले.या जखमींपैकी तिघे नगरचे रहिवासी आहेत.

पुष्पा मोहन भोसले(62) रा. काष्ठी ता.गोंदा असे मयत महिलेचे नाव आहे. तर कृष्णा भाले (12),ज्योती बाळासाहेब काळे(40), कल्पना रंगनाथ काळे (59), राम साळुंके(38)असे हे जखमी झाले आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, हिरडगाव येथे टुरिस्ट मार्फत श्री गोंदा येथील पुष्पा भोसले, संगीता पाचपुते, सुशिलाबाई वाबळे, आणि इतर महिला अशा एकूण 10 महिला केदार-बद्रीनाथ देवदर्शनासाठी 15 जून पासून निघालेल्या होत्या त्या 8 जुलै रोजी परतणार होत्या. पण नियतीचा मनात काही औरच होते. 29 जून रोजी देवदर्शन झाल्यावर डोंगरावरून परत येत असताना मुकटीया येथे डोंगराच्या माथ्यावरून दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली या भाविकांचे वाहन सापडले त्यात श्रीगोंदा येथील पुष्पा भोसले यांचा मृत्यू झाला आणि नऊ  भाविक जखमी झाले. घयनेची माहिती मिळतातच पोलीस आणि एसडीआरएफ चे पथक घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केलं.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती