रात्री झोपेत छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी

रविवार, 16 जून 2024 (15:28 IST)
ठाण्यात रात्री झोपेत असताना घराच्या छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी झाल्याची घटना कोपरी परिसरातील मीठबंदर रोड वरील चार मजली इमारतीत एका अपार्टमेंटमध्ये पहाटे 3:30 च्या सुमारास घडली. या इमारतीला आधीच धोकादायक म्हणून चिन्हांकित केले आहे. इमारत व्यवस्थापनाला लेखापरीक्षण व किरकोळ दुरुस्ती करण्याची नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी सुधारणा केली नाही. इमारतीची सद्यस्थिती पाहून पालिका अधिकारी निर्णय घेणार असे अधिकारी म्हणाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत 30 -35 वर्षे जुनी असून या इमारतीत 20 फ्लॅट असून त्यात 65 जण राहतात सध्या इमारत सहकार विभागाच्या प्रशासकाच्या ताब्यात आहे. या इमारतीच्या 10 फ्लॅट मध्ये तडे गेले आहे. 
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे परमुकांनी सांगितले रविवारी इमारती मधील एक कुटुंब झोपेत असताना त्यांच्या अंगावर छताचे प्लास्टर पडून एक व्यक्ती आणि त्याची दोन अल्पवयीन मुले जखमी झाली. प्रदीप मोहिते (46),यश मोहिते(16), निधी मोहिते(12)अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती