धक्कादायक घटना : तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळले

बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (18:24 IST)
नाशिक जिल्ह्यात दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये एका पुरुषासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 
संबंधित घटना ही नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावात घडली आहे. एकाच कुटुंबातील 3 जणांचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. तसेच या दुखद घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. वडिलासह दोन मुलांचा अशाप्रकारे मृतदेह सापडणे हे धक्कादायक असल्याची चर्चा सुरु असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खाणीत सापडलेल्या मृतदेहांमध्ये 34 वर्षीय शंकर महाजन, त्यांचा 4 वर्षीय मुलगा पृथ्वी महाजन आणि 3 वर्षीय मुलगी प्रगती महाजन यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण ही एक आत्महत्येची घटना असल्याचा पोलिसांना संशय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती