विदर्भ वगळता मुंबईसह कोकणातील ४ व मध्य महाराष्ट्रातील १० (खान्देश, नाशिक ते सांगली सोलापूर पर्यन्तच्या) अशा १४ जिल्ह्यात दि.१२, १३ (सोमवार, मंगळवार) असे २ दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. मराठवाड्यात उद्यापासूनच ३ दिवस अश्या पावसाची शक्यता जाणवते. विदर्भात आजपासून पुढील ४ दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
परवा, १४ डिसेंबर अंदमानात पुन्हा चक्रीय वारे स्थिती निर्माण होत आहे. तर काश्मीर, हिमाचल मध्ये पाऊस व बर्फ पडणार आहे. या दोघात महाराष्ट्रातील वातावरणाचे सँडविच होणार आहे. बघू या पुढील ४-५ दिवसात महाराष्ट्रात काय वातावरणीय बदल होतात ते बघण्यासारखे आहे.