केंद्रीय सुरक्षा व्यव्यस्था घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही त्यांनी सुनावले, त्या म्हणाल्या, काही जण केंद्रीय सुरक्षा घेत आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.ज्या मातीत आपण जन्मलो तेथील यंत्रणेवर आपला विश्वास नसावा, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. देशातील हे सर्वश्रेष्ठ पोलिस दल आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊ नये.कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि गुन्ह्यांची नि:पक्षपाती चौकशी करून छडा लावण्याची त्यांची क्षमता आहे. सध्या राज्यातीलच नव्हे तर देशातील वातावरण वेगळ्याच मुदद्यांवरून दुषित केले जात आहे, हे दुर्दैवी आहे.