महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही :फडणवीस

गुरूवार, 27 जानेवारी 2022 (21:45 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर वाईन विकण्याची परवानगी दिल्यावरुन घणाघात केला आहे. पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारु विक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू, महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारला फटकारलं आहे.
 
शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच, महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी अशी मागणी फडणवीसांनी महाविकास आघाडीकडे केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती