धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील उड्डाणपुलाजवळ एका शुल्लक कारणावरून तिघांनी भिक्षुकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. खून करणारे तीन जणांपैकी दोघे बापलेक आणि त्यांचा साथीदार असल्याचे समोर आले. मृत व्यक्ती रस्त्यावर दिवसभर भिक्षुकीकरून उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपुर्वी मृत भिक्षुकाने संजय पखाले याला रस्त्यावर जाताना हटकले होते, या गोष्टीचा राग त्यांचा मुलगा प्रतीकला आला. त्याला राग अनावर झाला , याचा बदला घेत प्रतिकने त्याच्या मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून भिक्षुकाला मारले. यादरम्यान त्या भिक्षुकाचा मृत्यु झाला.