चोरांना चोर नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं

बुधवार, 1 मार्च 2023 (21:53 IST)
सभागृहात बुधवारी (१ मार्च) सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. यानंतर जोरदार गोंधळ झाला. यानंतर संजय राऊतांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे झालेल्या सभेत याला प्रत्युत्तर दिलं.
 
संजय राऊत म्हणाले, “मला पत्रकारांनी विधिमंडळातील गोंधळविषयी विचारलं. मी सांगितलं की, हे ४० चोर आहेत आणि त्या ४० चोरांनी आमच्या विधिमंडळाचं ‘चोरमंडळ’ करून टाकलं आहे. मी इथं बोललो आणि लगेच महाराष्ट्राच्या विधानसभेत माझ्याविरोधात ठणाठणा बोंबा मारणं सुरू झालं. आम्हाला चोर म्हटले असं म्हणत त्यांनी सभागृह बंद पाडलं.”
 
“विधानसभेत माझ्याविरोधात हक्कभंग आणला. माझ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मला तुरुंगात टाका, असं म्हटले. मात्र, चोरांना चोर नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थितांना विचारला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती