चक्क १११ दुचाकी करून चोरट्याने रचला विक्रम,पडल्या बेड्या

शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:49 IST)
नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नव्या पोलीस आयुक्तांसमोर देखील ही गुन्हेगारी थांबवण्याचे आव्हान असणार आहे. अशातच नागपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत चोरीला गेलेल्या तब्बल 111 दुचाकी परत मिळवल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकाच चोरट्याने दोन वर्षात या 111 दुचाकी चोरल्या होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई करत 111 बाईक विदर्भातील नऊ जिल्ह्यातून एका सराईत दुचाईक चोराला अटक केली आहे आहे. 24 वर्षांच्या अट्टल दुचाकी चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवीन विक्रमच रचला आहे. याबाबत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली.
 
नागपूरमध्ये एका चोरट्याने दोन वर्षात तब्बल १११ गाड्या चोरुन नवा विक्रम रचला आहे. ललित भोगे असं चोरट्यांच नाव असून तो कोंढाळीचा रहिवासी आहे. हा गुन्हेगार फक्त 24 वर्षांचा ललितवर इतर कुठलेही गुन्हे दाखल नाही.
 
मात्र बाईक चोरीमध्ये मोठे गुन्हेगार त्याच्यासमोर फेल असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या ललित भोगेने ललितने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांमध्ये गाड्यांची चोरी केली. सर्वप्रथम तो गाड्या हेरायचा. सोसायटींची पार्किंग लॉट, बँकेबाहेरील गाड्या यावर तो पाळत ठेवायचा आणि गाड्या लंपास करायचा.
 
या चोरी केलेल्या दुचाकी तो ग्रामीण भागात विकत होता. विकत घेणाऱ्यांना तो कागदपत्रे दोन महिन्यात देतो म्हणून सांगायचा. मात्र त्याने कधीच कोणाला कागदपत्रे दिली नाहीत. या चोराने तब्बल 77 लाख रुपये या चोरीच्या दुचाकी विकून मिळवले आहेत.
 
दरम्यान, आरोपीने आणखी कुठे कुठे या चोरीच्या गाड्या विकल्या आहेत, नेमका त्याचा आकडा किती आहे, याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती