गावची जत्रा असते. जत्रेत तंबू असतो. तंबूत खोटा चंद्र असतो. मर्सडीज असते. त्या तंबूत लोकं जातात आणि फोटो काढतात. हा तंबू म्हणजे शिंदे गट आहे आणि तंबू आता उठायची वेळ आली आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केली.
शिंदे गट शिवसेनेचा वर्धपान दिन साजरा करणार आहे. त्याचा ट्रीझर नुकताच लॉंच करण्यात आला. याबाबत खासदार राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, असले ट्रीझर मी बघत नाही. गावी जत्रा भरत असते. त्यात तंबू असतो. तंबूत खोटा चंद्र, गाडी असते. तेथे जाऊन लोकं फोटो काढत असतात. शिंदे गट हा त्या तंबू प्रमाणे आहे. आता हा तंबू उठायची वेळ आली आहे, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. आमचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. आमचा कार्यक्रमत दणक्यात होणार आहे, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या.