गरागरा फिरणारा पाळणा अचानक तुटला, पाच जण जखमी

सोमवार, 3 एप्रिल 2023 (07:25 IST)
शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राम नवमी उत्सवाच्या यात्रेत मोठा अपघात घडला आहे. यात्रेमध्ये असलेला पाळणा तुटल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत.
 
शिर्डीमध्ये सुरू असलेल्या राम नवमी उत्सवाच्या यात्रेत मोठा अपघात घडला आहे. यात्रेमध्ये असलेला पाळणा तुटल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत.
यातल्या दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. पाळणा तुटतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमधून हा अपघात किती भीषण होता, हे दिसून येत आहे.
जोरजोरात फिरणाऱ्या या पाळणा तुटल्यामुळे बाजूला उभे असलेले लोकही जखमी झाले आहेत. या अपघातात ज्योती किशोर साळवे (वय 45) आणि किशोर पोपट साळवे (वय 50) यांच्या पायांना गंभीर इजा झाली आहे. तर भूमी अंबादास साळवे या 14 वर्षांच्या लहान मुलीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याशिवाय प्रवीण अल्हाट नावाची 45 वर्षांची व्यक्तीही दुखापतग्रस्त झाली आहे.
अपघातानंतर जखमींना शिर्डी संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांवरचे उपचार मोफत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपघातानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पाळणा चालवणाऱ्याने सुरक्षेची काळजी घेतली नव्हती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
 
दरम्यान गंभीर दुखापत झालेले साळवे दाम्पत्य अत्यंत गरीब असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या या घटनेमुळे शिर्डीच्या रामनवमी उत्सवाला गालबोट लागलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती