महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाच्या सेटवरून एक वाईट बातमी आली आहे. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळ्यात सुरू होते. चित्रपटाच्या सेटवरून एक 19 वर्षांचा मुलगा सज्जा कोठीजवळील टेकडीवरून 100 फूट खाली पडून गंभीर जखमी झाला आहे. नागेश खोबरे असे या तरुणाचे नाव असून तो सोलापूरचा आहे.त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळ्यात सज्जा कोठी परिसरात शनिवारी सुरु झाले. चित्रपटाच्या एका दृश्यासाठी घोडे आणले होते. नागेशला घोडे सांभाळण्याचे काम दिले होते. नागेश सज्जा कोठीच्या डोंगरावरच्या कडेला उभारून मोबाईलवर बोलत असताना बोलणे संपवून वळताना त्याचा तोल जाऊन तो 100 फूट खाली पडला.नागेश पडल्याचे समजल्यावर दोघे दोरीवरून खाली उतरले आणि नागेशला उचलून पन्हाळगड नेले नागेश गंभीररित्या जखमी होऊन त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.चित्रपटाचे दिगदर्शक महेश मांजरेकर यांनी नागेशच्या तब्बेती बद्दल विचारपूस केली असून सेटवरील सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिशचित करण्याचे आश्वासन दिले असून नागेशला उत्तम वैद्यकीय सेवा पुरविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.