राज्यसेवा मुख्य परीक्षा 4, 5 आणि 6 डिसेंबरला मुंबई-पुण्यासह ‘या’ 6 जिल्हा केंद्रावर होणार

मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (08:43 IST)
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी मुंबई, पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती  व नागपूर या जिल्हा केंद्रावर होणार आहेत.तसेच अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावे,असे कळवण्यात आले आहे.
 
यासंदर्भात आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या  सेवेतील विविध संवर्ग/सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020  च्या दिनांक 6 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 दिनांक 4,5 व 6 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.त्यामध्ये 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून.मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती