"राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."-सुप्रिया सुळे

शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (09:11 IST)
"सत्ता टिकली पाहिजे, हे त्यांचे धोरण आहे. सत्ता टिकावी यासाठी तडजोड करणे सुरू आहे. लोकांचं नुकसान झालं तरी चालेल पण स्वत:चं नुकसान होऊ नये असं हे स्वार्थी ईडी सरकार आहे. राष्ट्रवादी पक्ष हा संविधान मानणारा आहे. तर भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की, एक देश एक पक्ष आहे. ही एक हुकूमशाहीच म्हणावी लागेल. ही देशातील दडपशाही आहे" असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे य़ांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे
 
 "राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज; एक कार्यक्रमाला जातील, दुसरे..."
"आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी Whatsapp वर पाठवला आहे" असं म्हटलं होतं. तसेच सुप्रिया सुळे यांनी "महाराष्ट्रातलं सरकार ओरबाडून, दडपशाही करून, ईडी करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं आहे. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळत... हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्हात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही. मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही" असंही म्हटलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती