राज्य सरकराने कोकणात जाणाऱ्यांसाठी दिली खूशखबर

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (21:46 IST)
गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांना भक्तांना यंदाही टोलमाफी मिळणार आहे. मुंबई-बंगळुरु आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर टोल माफ करण्यात आला आहे. ही टोलमाफी 26 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यासाठीचे पासेस आणि स्टिकर्स पोलीस विभागाकडे उपलब्ध आहेत.
 
गणेशोत्सव 2022 कोकण दर्शन अशा आशयाचे हे स्टिकर्स असतील. त्यावर पथकर माफी पास, वाहन क्रमांक, चालकाचं नाव लिहून ते स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस किंवा पोलिसांकडे द्यायचेत. टोलमाफीसाठी भक्तांना पासेस घ्यावे लागणार.  टोलनाक्यावर पासेस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी वाहनांची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर टोलपास मिळवता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती