जाहिरातबाजीवर शिंदे-फडणवीस सरकारने 7 महिन्यात केले 42 कोटी खर्च

सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (09:43 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यापासून फक्त 7 महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल 42 कोटी 44 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती RTI मधून प्राप्त झाली आहे. ही बातमी 'एबीपी माझा'ने दिली आहे.
 
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाकडे मागितली होती. त्यांनी म्हटलं आहे की, "नुकतंच राज्य शासनाकडून ही देयके मला उपलब्ध झाली. या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास 19 लाख 74 हजार रुपये जनतेच्या खिशातून खर्च होत आहेत."
 
असं जाहिरातबाज सरकार जनतेच्या विकासासाठी काम करेल का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती