सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकार कडून होळीच्या पूर्वी एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता वाढवू शकते. या सूत्रानुसार महागाई भत्ता पूर्ण 4 टक्के वाढण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की , डिसेंबर 2022 साठी सीपीआय-आयडब्ल्यू जारी करण्यात आला होता. सध्या DA 2016 मध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.यंदा महागाई भत्ता सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. ते म्हणाले की, वित्त मंत्रालयाचा खर्च विभाग DA वाढविण्याचा प्रस्ताव तयार करेल. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. 1 जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यात वाढ लागू होईल.