'त्या' सात जणांची शोध मोहीम सुरु

सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (17:11 IST)
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भारतासह अनेक देशांची झोप उडवली आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्रातही दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रातही भीतीचं सावट आहे. 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान जवळपास 7 जण साऊथ आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे पालिका आयुक शर्मा यांनी ही माहिती दिली. या 7 जणांची शोध मोहीम पालिकेने सुरू केली आहे. 
 
या 7 जणांना कोणती लक्षणे आढळतील त्यांची तपासणी आणि विलगीकरण करण्याचे काम पालिका करणार आहे. डोंबिवलीची घटना ताजी असतानाच ठाण्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या जिनोम सिक्वेंसींग तपासणीचा अहवाल 7 दिवसांत येणार आहे. त्याच्या कुटुंबातील 6 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती