राज्यात कोरोनाचा धोका वाढला,सक्रिय रुग्णांची संख्या 1700

शनिवार, 25 मार्च 2023 (10:34 IST)
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुन्हा कोरोना डोकं उंचावत आहे. कमी झालेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्ण आढळले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. 
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढत असून सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. पुणे शहरात 510 रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात 343 रुग्णांची नोंद झाली असून 194 रुग्ण बरे झाले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,71,673  लोकांची तपासणी केली आहे. आता पर्यंत एकूण  79,90, 824  जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
कोरोनाचा धोका वाढता राज्यात मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासन देखील अलर्ट मोड वर आहे. प्रौढ रूग्णांच्या उपचारांसाठी 'लोपीनाविर-रिटोनावीर', 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन', 'आयव्हरमेक्टिन', 'मोलनुपिराविर', 'फॅविपिरावीर', 'अझिथ्रोमायसिन' आणि 'डॉक्सीसायक्लिन' यासारखी औषधे वापरली जाऊ नयेत, असं सांगण्यात आलं आहे.
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती