मागील दीड वर्षांपासून धनश्रीच्या दातांमध्ये समस्या उत्पन्न झाली होती, त्यामुळे ती निगडीच्या नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात दीड वर्षांपासून उपचार घेत होती. त्यानुसार धनश्री ही आठ दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात दाखल झाली. तिच्यावर उपचार सुरुही झाले. परंतु ज्यावेळी उपचार सुरू होते. त्यावेळेस धनश्रीचा अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली होती, याच घटनेकडे नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केले. त्यात धनश्रीचा मृत्यू झाला आहे. असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. घटना समजताच स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टर पाटील दाम्पत्य फरार झाले आहे. धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज केला आहे. त्यानुसार निगडी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे दातांचे दुखणे योग्य डॉक्टर कडून तपासून घेणे गरजेचे आहे.