14 मार्चला नियोजित असलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्याने निर्बंध लावले आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप ही परीक्षा कधी घेण्यात येणार आहे याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही.
आता,नुकतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या अडचणी, शंका निवारणासाठी एमपीएससीकडून टोल फ्री- हेल्प डेस्क सुविधा सुरू करण्यात आली आहे.