मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शिखर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी असोसिएशनच्या सर्वोच्च परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी बैठकीत शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्वोच्च परिषदेच्या सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. त्यानंतर या संग्रहालयाला शरद पवार असे नाव देण्याची घोषणा करण्यात आली.
2001 ते 2013 या काळात शरद पवार यांनी एमसीएची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षही होते. संग्रहालयासाठी शरद पवार यांच्या नावाचा निर्णय घेतल्याचे स्वागत करण्यात आले आहे. शरद पवार यांनी मुंबई क्रिकेटचा लौकिक राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आणला. क्रिकेट विश्वात शरद पवार यांचे योगदान महत्त्वाचे आहे. हे योगदान लक्षात घेऊन संग्रहालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.