मुंबई येथील मेट्रो कारशेडच्या कामामुळे मानखुर्दजवळ महाराष्ट्र नगरमधील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, लोकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. हा रस्ता बांधून देण्याचे आश्वासन MMRDA मेट्रो प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप हे आश्वासन पूर्ण न झाल्याने शिवसनेचे आमदार तुकाराम काते यांनी चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले आहे. आश्वासन पूर्ण न झाल्याने तुकाराम काते चक्क रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी मेट्रो कारशेडच्या गेट समोरील रस्त्यामधील चिखलात बसले आणि ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र नगरची रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत आणावा अशी मागणी तुकाराम काते यांनी यावेळी केली. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी रस्त्याचे व इतर काम लवकरात लवकर पूर्ण करुन देऊ असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप MMRDA प्रशासनाने हा रस्ता बनवलेला नाही,” अशी माहिती तुकाराम काते यांनी वृत्त वहिनीला दिली आहे. मात्र चिखलात बसून तेही सत्तेत असलेल्या आमदाराचे आंदोलन पाहून चर्चेचा विषय झाले आहे.