शिवसेना आणि एनसीपी आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी 7 ऑगस्टला होणार

बुधवार, 31 जुलै 2024 (11:52 IST)
शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे आमदार अपात्र प्रकरणात उद्धव ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सर्वोच्च न्यायालय याच दिवशी एनसीपी अजित पवार आणि एनसीपी शरद पवार गटाच्या याचिकेवर देखील सुनावणी करणार आहे. असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश डी वाय चंद्रचूड यांनी सांगितले. 

याचिकेत शरदपवार गटाकडून अजित पवारांच्या गटातील आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सदस्यांना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी  अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेले. 
 
शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा मांडत खटल्यावर निर्णय देण्याची विनंती केली.ते म्हणाले, आम्हाला या प्रकरणात स्पष्टता हवी असून याचिका 6 ऑगस्टला प्रलंबित होती. सोमवारी एनसीपीने आम्हाला टॅग केल्यावर याचिका सप्टेंबर साठी राखीव ठेवण्यात आली .

या वर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, एनसीपीचा खटला शिवसेनेच्या खटल्यासह टॅग करण्यात आला असून आता दोन्ही प्रकरणांवर सुनावणी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निर्णयांनंतर आगामी विधानसभा निवडणुकींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती