''आठवड्यात वांद्रेत एका शाखेवर बुलडोझर चालवलं आहे. तुम्ही सगळे मुंबईकर, महाराष्ट्राचे आहात. तुमच्या मनातल्या सगळ्या भिंती बाजूला करुन बघा. जो हातोडा चालवला होता तो कुणाच्या फोटोवर चालवला होता. कुणी चालवला होता, आत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. ज्यादिवशी आपलं सरकार येईल त्यादिवशी यांच्यावर बुलडोझर चालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
मी आज मुद्दाम मोर्चा घेतला. कारण शिवसैनिक म्हणून आपण लोकांशी बोलतो. लोकांना आजही वाटतंय की, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आमदार मिहीर कोटे यांनी हा घोटाळा केला. त्यांनी पत्र लिहिले तेव्हा बरोबर प्रश्नही विचारले होते. त्यांना वरुन फोन आला आणि मामला शांत करण्यास सांगितलं. आमदार रईस शेख यांनी दुसरं पत्र लिहिलं आणि त्यांना उत्तर आलं. पण मी पाठवलेल्या पत्राला उत्तर आलं नाही. मला जे उत्तर आलं, डीएमसींना वेगळ्या खात्यात टाकलं, तुम्हीच हे टेंडर बघा. एकाच व्यक्तीने टेंडर पूर्ण केलं पाहिजे. फेब्रुवारीला रईस शेख यांना याच डीएमसींनी उत्तर दिलं. पण त्यांची बदली झाली आहे. जेव्हा उत्तरं येतात तेव्हा औपचारिक पत्र येतात. डीएमसी काळे यांनी तीन अधिकाऱ्यांची समिती बनवली आहे. त्यांच्या समितीचा अभ्यास झाला की आम्ही उत्तर देऊ. नंतर मला उत्तर आलं की, तशी कमिटीच बनवलेली नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.