जायकवाडी धरणात पाण्याची आवक जोरात सुरु आहे. परिसराला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पाणीसाठा 86 टक्क्यांवर गेलाय त्यामुळं कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने दिलाय. गोदावरी पूरग्रस्त रेषेवरील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा असे पत्र पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेचा आणि सुरक्षितस्थळी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी वरील धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. जायकवाडी वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे.