याबाबत नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना सांगितले, की मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय कृष्णा अनिल सोनवणे याचे मागील रविवारी दि. 16 जुलै रोजी शेतात खेळण्यासाठी गेला असताना अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना समोर आली होती, तर 18 जुलै रोजी पोहाणे गावातील मांजरी नाला येथे त्याचे प्रेत पुरल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गळा कापून जिवे ठार मारणे व पुरावा नष्ट करणे या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मालेगावचे पोलीस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, अंकुश नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विजय वाघ, नितीन सपकाळे, गौतम बोराळे, संतोष हजारे, कदम, हिंमत चव्हाण, बापू महाजन, निशा साळवे, रणजित साळुंके, गजानन कासार, महेंद्र पवार, किरण दुकळे यांच्या पथकाच्या पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या.
त्यांनी याबाबत तपास सुरू केला असता मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी उमाजी गुलाब पवार (रा. 42, पोहाणे), रोमा बापू मोरे 25), रमेश लक्ष्मण सोनवणे, गणेश लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण नवल सोनवणे या आरोपींनी कृष्णा अनिल सोनवणे यास फूस लावून पळवून नेले व त्याची हत्या केल्याचे समोर आले. या आरोपींनी हा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.