गेल्या 2023 साली अल निनोचा प्रभाव मान्सूनच्या पावसावर दिसून आला होते. इतकेच काय अल निनोमुळे उष्णता प्रचंड जाणवली होती. २०२३ हे उष्ण हवामानाचे वर्ष ठरले होते. अल निनोमुळे गेल्या वर्षी अनेक भागात पावसाने सरासरीही गाठली नसल्याने पाणीटंचाईचे संकट उभे थाटले आहे. यामुळे याचा यंदाच्या मान्सूनवर देखील प्रभाव जाणवणार का? यांची चिंता प्रत्येक नागरिकांना आहे. मात्र जागतिक हवामान संस्थेने आनंदवार्ता दिली आहे. यंदा धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
खरंतर २०२३ हे उष्ण हवामानाचे वर्ष ठरल्यानंतर अल निनोचा प्रभाव यावर्षी जूनपर्यंत समाप्त होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा दमदार पावसाच्या आशा उंचावल्या आहेत.
या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी जून-ऑगस्टपर्यंत ला निना परिस्थिती निर्माण झाल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचा पाऊस चांगला होईल, असे म्हटले आहे. जून-जुलैपर्यंत ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले.
काय आहे अल निनो?
अल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्याची प्रक्रिया, अल-निनोच्या प्रभावामुळे देशात मान्सूनचे चक्र विस्कळीत होते. त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते.