राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानी प्रकरणी १५ मे रोजी सुनावणी होणार

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (17:58 IST)
ठाणे (महाराष्ट्र) महाराष्ट्रातील भिवंडीच्या एका कोर्टाने कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी ह्यांच्या विरोधात मानहानी च्या प्रकरणी सुनावणी १५ मे पर्यंत तहकूब केली आहे. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आरएसएस) च्या स्थानिक अधिकारी राजेश कुंटे ह्यांनी ठाण्याच्या भिवंडी मध्ये दिलेल्या राहुल गांधींच्या भाषणाला बघून २०१४ साली त्यांच्या वर खटला दाखल केला होता.या भाषणामध्ये कांग्रेस नेत्याने आरोप केले होते की महात्मा गांधी ह्यांच्या हत्ये मागे आरएसएसचा हात आहे.  
 
२०१८ मध्ये गांधी भिवंडी येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केले होते.त्यानंतर त्यांच्या विरोधात आरोप लावण्यात आले  आणि खटल्याची सुनावणी होऊ लागली.न्यायदंडाधिकारी जे.व्ही पालीवाल ह्यांच्या समोर  हे प्रकरण शनिवारी सुनावणी साठी आले तेव्हा 
 गांधी ह्यांचे वकील नारायण अय्यर ह्यांनी कोविड१९ चा हवाला देऊन कांग्रेच्या नेत्याला सुनावणी पासून सवलत देण्याची विनवणी केली आणि कोर्टाने तशी परवानगी देखील दिली.
कुंटे ह्यांचे वकीलपीपी जयवंत यांनी या प्रकरणी पुरावे म्हणून काही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी मिळावी या साठी मुंबई उच्च नायायालयात दाखल केलेल्या याचिकेत निवेदन देत सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. 
 
दंडाधिकारी पालीवाल ह्यांनी सांगितले की हायकोर्टाने खालच्या कोर्टात खटल्याला स्थगिती देण्याचे आदेश दिले नाही. जयवंत ह्यांनी खटल्याला तहकूब करण्याची विनंती केली ह्याला कोर्टाने परवानगी दिली. कोर्टाने या खटल्यालची पुढील सुनावणीसाठी ची  मुदत १५ मे दिली असून त्याच दिवशी तक्रारदाराचे म्हणणे नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती