दरम्यान, कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन देण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याने सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला असल्याची माहिती सिटी लिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी चालविण्यात येणार्या सिटीलिंक या बस सेवेतील चालक आणि वाहक हे दोन्हीही कर्मचारी ठेकेदाराच्या माध्यमातून हे कर्मचारी काम करीत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी या सिटीलिंकची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळेपासून ठेकेदारी पद्धतीनेच कर्मचारी हे काम करीत आहेत. परंतु मागील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे सुमारे पाचशे कर्मचारी हे कालपासून पगार मिळावा, या मागणीसाठी संपावर होते.
त्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील नागरिकांना अतिशय हाल सहन करावे लागले होते. मात्र महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत, सिटीलिंककचे व्यवस्थापक मिलिंद बंड आणि ठेकेदार, तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या बैठक होऊन संपावर तोडगा काढण्यात आला.