याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादिनुसार राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक संतोष भाऊराव धिंदळे (रा. केळुंगण, ता. अकोले) व अनिल भरत पोपेरे (रा. कोंभाळणे, ता. अकोले, जि. अ.नगर) या दोघांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित परिचारीका ह्या केळुंगण परिसरातून राजूर येथील एका डॉक्टरांकडे कामासाठी येत असतात. मात्र, एके दिवशी धिंदळे व त्याचा मित्र पोपेरे हे एक ओमनी कार घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले. पोपेर हा पुढे गेला असता परिचारीकेस म्हणाला की, बाहेर गाडी आली आहे.
तुम्ही पटकन चला. तेव्हा या तरुणीस वाटले की, कोणी पेशन्ट आले आहे. त्यामुळे, त्या घाईघाई बाहेर आल्या. गाडीत बघितले तर भलताच रुग्ण बसलेला होता. तेव्हा तिने गाडीत बसलेल्या धिंदळे शिक्षकास विचारले की काय झाले आहे. तेव्हा त्याने काही एक न एकता तिचा हात धरुन जवळ ओढले आणि मिठी मारली असे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर, घाबरलेल्या परिचारीकाने हॉस्पिटलकडे आली. तेव्हा धिंदळे हा तिच्यामागे पळत येऊन त्याने तिचे केस घट्ट पकडून ओढत शिविगाळ करत म्हणाला की, तु दुसऱ्याच्या गाडीवर का ये जा करते, मी तुला घरी नेवून सोडतो असे म्हणत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला.
तेव्हा मोठा प्रसंगावधान राखत तिने हॉस्पिटलच्या एका खोलीत जाऊन स्वत:ल कोंडून घेतले. तिने एका नातेवाईकास फोन करुन घडला प्रकार सांगितला आणि पोलिसांना घेऊन हॉस्पिटलला येण्यास सांगितले. त्यानुसार राजूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे यांची टिम तेथे काही क्षणात हजर झाली आणि या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.