मांजर समजून बिबट्याला पाळले

गुरूवार, 19 मे 2022 (18:33 IST)
मोर्जर शिवारात रावसाहेब गंगाराम ठाकरे यांचे   नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शेत असून तेथे त्यांचे घरही आहे. आठवडाभरापूर्वी एका शेतातील घराजवळ खेळत असताना घरातील मुलांना मांजरीच्या पिल्लासारखे दिसणारे पिल्लू दिसले. मांजर रंगाने वेगळी आणि सुंदर असल्याने मुले तिच्याशी खेळू लागली. मात्र, ते मांजरीचे पिल्लू नसून बिबट्याचे पिल्लू असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले आणि त्यानंतर मग मात्र त्यांना घाम फुटला. या बिबट्याची आई (बिबट्याची मादी) परत न आल्यानं अखेर बछड्याला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. यावेळी मात्र शेतकरी कुटुंबाला गहिवरून आलं होतं.
  
  शेतकरी कुटुंबानं या पिलाची घरातील सदस्यप्रमाणे काळजी घेतली. त्याला दररोज दीड लिटर दूध दिले जात होते. एवढेच नाही तर दररोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई त्याला घेऊन जाईल, अशी देखील काळजी घेतली. मात्र बिबट्या त्याच्या बछड्याला नेण्यासाठी आला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती