औली येथे बर्फात दबलेले मृतदेह महाराष्ट्राच्या रहिवाशांचे -एन पांडे

रविवार, 2 जानेवारी 2022 (11:12 IST)
चमोली. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील औली येथील गोरसन बुग्याल येथे एसडीआरएफच्या पथकाने नवीन वर्षात दोन मृतदेह बाहेर काढले. ओळख पटल्यानंतर हे दोन्ही मृतदेह औली येथे नवीन वर्ष साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या महिला व पुरुष पर्यटकांचे असल्याचे निष्पन्न झाले. औलीपासून 5 किमी वर बर्फाने वेढलेले पर्वत आहे. इथे पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद घेतात. वर जाऊन बर्फ पाहण्याच्या इच्छेने आलेले हे दोघे पर्यटक बर्फातच दाबले गेले. हे दोघेही महाराष्ट्रातून फिरायला आले होते.  संजीव गुप्ता वय 50 वर्षे आणि सीमा गुप्ता वय 35 वर्षे, असे या मयत पर्यटकांचे नाव आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या या दोघांचे मृतदेह SDRF च्या टीमने बर्फातून बाहेर काढले आणि त्यांची ओळख पटवून आवश्यक ती कारवाई करण्यात आली.
31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक औली येथे पोहोचले होते, त्यातील काहींनी अधिक बर्फ पाहण्याच्या इच्छेने गोरसन बुग्याल गाठले होते. चारही बाजूंनी जंगलाने वेढलेल्या गोरसन येथे अजूनही सुमारे एक फूट बर्फ पसरलेलं आहे. इथे रात्रीच्या मुक्कामाची सोय नाही. पर्यटक इथे बर्फात खेळण्याचा आनंद घेतात. या बर्फात खेळताना, कदाचित पाय घसरल्यामुळे हे दोन्ही पर्यटक एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात बर्फात दाबले गेले.आणि त्यांचा दारुण अंत झाला. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती