देशात राजकीय नव्हे विचारधारेची लढाई-राहुल गांधी

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:47 IST)
नागपूर : भाजप देशाला गुलामगिरीकडे घेऊन जात आहे. कोणाचेच ऐकायचे नाही, हा पंतप्रधान मोदींची स्वभाव आहे. त्यामुळे वरून आदेश दिले जातात आणि बाकीच्यांना ते ऐकावे लागतात. मात्र, कॉंग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. देशाचे नेतृत्त्व सर्वसामान्य लोकांच्या हाती असायला हवे, ही आमची विचारधारा आहे. त्यामुळे देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे, असे सांगत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप, रा. स्व. संघावर जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाने औचित्य साधून कॉंग्रेस पक्षाने नागपुरात शक्तिप्रदर्शन करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले.
 
नागपुरात आज काँग्रेसचा 139 व्या स्थापनादिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तैयार है हम या टॅगलाईनखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. नरेंद्र मोदी हे स्वत:ला ओबीसी असल्याचे म्हणाले होते. त्यांचे सरकार हे ओबीसी असल्याचे ते म्हणाले होते. मग त्यांना आम्ही विचारले की, त्यांच्या सरकारमध्ये किती ओबीसी लोक आहेत, त्यांच्या सरकारमध्ये किती अधिकारी ओबीसी आहेत? त्यानंतर ते म्हणाले की, देशात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे गरिबी. मग असे असेल तर तुम्ही स्वत:ला ओबीसी कसे काय म्हणता, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी आम्ही दिल्लीत सत्तेत आलो तर देशात जातीय जनगणना केली जाईल, असे आश्वासन दिले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती