मालेगाव तालुक्यातील आंदोलन पेटले; मुंबई-आग्रा महामार्गांवर आंदोलकांचा रास्ता रोको, ही आहे मागणी

सोमवार, 5 डिसेंबर 2022 (21:28 IST)
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालूक्यातील बोरी-अंबेदरी बंदिस्त पाईप लाईन आंदोलन पेटले असून संतप्त शेतकरी, ग्रामस्थांनी मालेगाव विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई -आग्रा महामार्गांवर असलेल्या चाळीसगाव फाट्यावर केला रस्ता रोको. आंदोलनात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यासह इतर पक्ष संघटना आणि मोठ्या संख्येने महिला देखील झाल्या सहभागी.
 
बोरी-अंबेदरी येथे धरणातून बंदिस्तपाईप लाईन टाकण्यात येत आहे. या पाईपलाईनला अनेक गावातील शेतक-यांचा विरोध असल्याने गेल्या काही दिवसापासून येथे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलना मागे घ्यावे यासाठी काही दिवसापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलन स्थळी जात आंदोलक शेतक-यांशी चर्चा केली होती. यावेळेस या योजनेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. बंदिस्त पाईप लाईन झाली तरी पाटचारीला पाणी पाईपलाईनला लावलेल्या गेट मधून सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्यावर शेतक-यांच समाधान झाले नसून अद्याप ही त्यांचा बंदिस्त पाईपलाईनला विरोध आहे. आता हे आंदोलनकर्ते संतप्त झाले असून त्यांनी थेट रास्ता रोको करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती