मराठी साहित्य संमेलन ९७ वे संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार

सोमवार, 24 एप्रिल 2023 (08:17 IST)
मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाबाबत पुण्यातील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. ९७ वे संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अमळनेरची निवड करण्यात आली.
 
साने गुरूजींनी शाळेत शिकवत असताना विद्यार्थी नावाचे एक मासिक प्रकाशित केले, जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यांच्या वाङ्मयीन कर्मभूमीत हे संमेलन ५०च्या दशकानंतर पाहिल्यांदा होत आहे. अमळनेर तालुक्यात साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकाऱ्यामुळे अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पार पाडण्यास सक्षम असल्याचं मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी म्हणाले.
 
नागपूरमधील वर्ध्यात ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. त्यावेळी संमेलन स्थळाची अधिकृत घोषणा मुंबईतून करण्यात आली होती. तसेच  मराठवाड्यातील उदगीर तालुक्यात ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती