ठाणे: ठाण्यात डॉक्टरने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. 21 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर डॉक्टरला अटक करण्यात आली असून संबंधित रूग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. प्रतीक तांबे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायलयात हजर करण्यात आले होते.