शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. जून २०२२ मध्ये प्रतिस्पर्धी गट उदयास आले तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत असल्याच्या आधारावर शिंदे गट हीच 'खरी' शिवसेना असल्याचे विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे शिंदे गटाला सांगण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याबाजून आज वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.