शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय घेतले, निर्णयाची अंमलबजावणी लवकर
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (17:31 IST)
Cabinet meeting:आज राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली असून 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये मुलींसाठी निर्णय घेण्यात आले आहे. मुलींच्या जन्मदरच्या वाढीसाठी जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारने लेक लाडली योजनेअंतर्गत मुलींना पहिल्या टप्प्यात पाच हजार,दुसऱ्या टप्प्यात 6 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 8 हजार रुपये मिळणार असून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या बाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तडकरे यांनी मुलींच्या जन्मदर वाढीसाठी जन्मानंतर मिळणाऱ्या अनुदानात सरकारने वाढ केल्याची माहिती दिली.
लेकलाडली योजने अंतर्गत पिवळा आणि केशरी रेशनकार्ड धारकांच्या कुटुंबात एखाद्या मुलीने जन्म घेतल्यावर मुलींसाठी 5 हजार रुपये अनुदान दिला जाईल. तर मुलगी पाहिलीत गेल्यावर 6 हजारांचे अनुदान मिळेल. तर इयत्ता अकरावीत गेल्यावर राज्य सरकार कडून तिला रुपये 8 हजार मिळणार. तर मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 75 हजार मिळणार आहे. अशा प्रकारे मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहे.