प्रभाग पध्दतीवर ठाकरे मंत्रिमंडळाचे ‘शिक्कामोर्तब’ ! मनपा, नगरपालिका अन् नगर पंचायतीमध्ये ‘या’ पध्दतीची असेल ‘रचना’

बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:33 IST)
राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने  घेतला होता.परंतु हा निर्णय बदलण्यात येईल अशी शक्यता वर्तविली जात होती.मात्र, आता महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणताही बदल होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली.मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  प्रभाग पद्धतीमध्ये कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
राज्यातील ठाकरे सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचार होईल असे स्पष्ट संकेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले होते. पण महापालिकांच्या प्रभाग पद्धतीत कोणतेही बदल होणार नाहीत.
 
महापालिकेत तीन ऐवजी दोन सदस्य प्रभाग पद्धत असावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती. काँग्रेसच्या या मागणीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु प्रभाग रचनेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने कायम ठेवला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धत कायम राहणार आहे.
 
हे आहेत निर्णय
 
– मुंबईत 1 वार्ड पद्धत
 
– राज्यातील उर्वरित महापालिका 3 सदस्य प्रभाग
 
– नगरपालिका नगर परिषद 2 सदस्य प्रभाग
 
– नगर पंचायतीला वार्ड नुसार सदस्य असतील

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती