महाराष्ट्रात ''लाडका भाऊ योजना'' करिता शिंदे सरकारवर ठाकरे गटाची टीका

शुक्रवार, 19 जुलै 2024 (14:36 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात केली. ठाकरे शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की भीक नको, नोकऱ्या द्या. तसेच हक्काच्या नोकऱ्या द्या अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. 
 
मोदी सरकारची धोरणे मागील दहा वर्षांपासून याला जवाबदार आहे असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तसेच देशामध्ये बेरोजगारीला त्रासून अनेक आत्महत्या होतांना दिसत आहे. म्हणून स्थानिकांना नोकऱ्या देण्यासाठी कर्नाटक राज्याने मोठा निर्णय घेण्याचे ठरवले. सर्व खाजगी व्यवसायांमध्ये स्थानिकांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ठाकरे म्हणाले की, कर्नाटक सरकारचा हा निर्णय योग्य आहे. 
 
तसेच ठाकरे गट म्हणाले की, बाजूच्या राज्यात कर्नाटकमध्ये हा विचार अमलात आणला आहे जो बाळासाहेबांनी 50 वर्षांपूर्वी मांडला होता. तसेच ठाकरे गटाने आरोप केला आहे की, नोकऱ्या आणि उद्योग गुजरातकडे नेले जात आहे. महाराष्ट्रला लुटले जात आहे. तसेच ठाकरे गट नोकरी आणि बेरोजगारी यावर आक्रमक झाल्याचे दिसले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती