टेस्ला आमच्याकडेया राज्याकडून निमंत्रण

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (08:42 IST)
अमेरिकीेची कार उत्पादक कंपनी टेस्ला चे प्रमुख एलॉन मस्क यांना महाराष्ट्र ने निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्रा बरोबरच, तेलंगणा, पंजाब आणि प बंगाल या राज्यानी आपल्या राज्यात येऊन उत्पादन घेण्याचे निमंत्रण दिले आहे.
गेल्याच आठवड्यात भारत सरकारच्या नियमांच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ जात असल्यामुळे टेस्लाला भारतात येण्यासा उशीर होत असल्याचे मस्क यांनी सांगितले होते. भारतात सरकारी आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची नाराजी मस्क यांनी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मस्क यांना आमंत्रण दिले आहे. टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी पाटील यांनी मस्क यांच्या ट्‌विटला रिप्लाय करुन दिली.
भाजपाची सत्ता असणारी राज्ये टेस्लासारखी कंपनी महाराष्ट्राचीच निवड करेल, असे वाटत असताना कार्यालयासाठी मस्क यांनी बंगळुरूची निवड केल्याने टेस्लाचा प्रकल्प भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातच जाणार असे वातावरण तयार झाले होते. पण मस्क यांच्या ट्‌विटमुळे इतर राज्यांना गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी मिळाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती