धुळे – देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. असे असताना आज एक वाईट बातमी समोर आली आहे. एका एसटी बस व टक्रचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चार ते पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव चौफुली येथे झाला आहे.