नाशिकमधून एका अपघाताची धक्कादायक बातमी आली आहे. नाशिकमधील चांदवड राहुड घाटावर एक भीषण अपघात झाला आहे. एकाच वेळी 9 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटावर अपघातांची मालिका सुरूच आहे,एकाच घाटावर तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली आहेत. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 21 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.