छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून तणाव

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (12:34 IST)
अमरावती नंतर आता सांगलीच्या जत शहरात छत्रपती शिवाजी चौकात एका मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा लोकवर्गणीतून 16 लाख रुपयांहून अधिक खर्च करून तयार करण्यात आला आहे. आता हा पुतळा बसवण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्याधिकाऱ्यांनी पुतळा बसवायला आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवला जाऊ शकणार नाही. असे सांगण्यात आले आहे. तर पुतळा बसवणाऱ्या समितीने जुन्या ठिकाणीच पुतळ्याचे प्रतिष्ठापन केले जाणार असून जीर्णोद्धाराचे काम सुरु असल्याने  परवानगीची आवश्यक नसल्याचा दावा केला आहे.या वरून जत शहरात पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप व आमदार विक्रम सावंत यांच्यात वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुतळा छत्रपती शिवाजी चौकात 1962 साली बसविण्यात आला होता. नंतर त्याच्या फलाटावर वाहन आदळल्याने हा पुतळा हटविण्यात आला होता. नंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवून जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यानी घेतला. यंदाच्या शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी हा पुतळा बसवला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. पुतळा बसविण्याच्या वादावरून हे प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्यामुळे सध्या शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्त केला असून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती