परवीन घेलाची नावाची 31 वर्षीय तरुणी पुण्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्स करण्यासाठी इराणहून पुण्याला आली होती. तिथे तिची एका मित्राच्या माध्यमातून धनराजशी ओळख झाली. मे महिन्यात तेहरानहून पुण्यात आलेली परवीन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनराजला भेटली. ती धनराजच्या कोरेगाव पार्क येथील आलिशान घरात राहू लागली. मात्र यानंतर धनराज तिला मारहाण करु लागला. त्यानं तिचा पासपोर्ट, इतर कागदपत्रं आणि मोबाईलदेखील जप्त केला. त्यामुळे परवीनला तिच्यावर होत असलेला अन्याय कोणालाही सांगता आला नाही. अखेर परवीननं इन्स्टाग्रामच्या मदतीनं तिच्या अवस्थेची माहिती मैत्रिणीला दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परवीनची सुटका केली.