मुंबई उपनगरात टॅक्सींची संख्या सरासरी ४५ हजार तर रिक्षाची सरासरी संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. पुर्वी मुंबईच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. मीटर अप असल्यावर टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे, तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, असे संकेत पाळले जायचे. मात्र कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते.