तलाठी भरती घोटाळा! घोटाळ्यात महिला कर्मचाऱ्याचा समावेश , महिलेला अटक

रविवार, 10 सप्टेंबर 2023 (15:01 IST)
राज्यात तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली होती . टीसीएस च्या माध्यमातून ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. या परीक्षेत कॉपी पुरवण्याचे प्रकार उघडकीस आले असून या तलाठी भरती घोटाळ्यात आरोपींना अटक केली असून आता त्यात अजून माहिती समोर आली आहे. औरंगाबाद मध्ये एका परीक्षा केंद्रावर तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी परीक्षा केंद्राच्या बाहेरून एका व्यक्तीला अटक केली असून राजू भीमराव नागरे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात परीक्षा केंद्रावर हाऊसकिपींगचा काम करणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. या कामासाठी तिला 3 लाख रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे.
 
औरंगाबादच्या आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर तलाठी भरती परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम परीक्षा केंद्रातील कर्मचारी करत होते. त्यांना शाहरुख युनूस शेख, पवन शिरसाठ आणि बाली हिवराळे हे कॉपी पुरवत होते. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या परीक्षा केंद्रावर शाहरुख आणि पवन हे दोघे टीसीएसचे कंत्राटी पर्यवेक्षक म्हणून काम बघत  होते तर बाली हिवराळे सफाई कामगार होती. आणि त्यांना या कामासाठी 3 लाख रुपये मिळत असे.अशी माहिती पोलिसांना आरोपींनी दिली  
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती